Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

बोरुळ येथे यल्लमा देवीच्या मंदिराकडे जाणारा अडवलेला रस्ता खुला करुन मिळणेबाबत दक्षिणच्या तहसिलदारांना निवेदन...

 बोरुळ येथे यल्लमा देवीच्या मंदिराकडे जाणारा अडवलेला रस्ता खुला करुन मिळणेबाबत दक्षिणच्या तहसिलदारांना निवेदन...



दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरुळ येथील गट नं-135 या गटातील सर्वांना येण्या- जाण्यासाठी पुर्वापार दक्षिणोत्तर वहिवाटी रस्ता आहे. सदर गटा मध्ये बिरप्पा यलप्पा व्हनमाने हे उत्तरेकडील बाजुस खातेदारांना वहिवाट करण्यासाठी रस्ता अडवित आहेत. दक्षिणे कडील बाजुस व्हनप्पा रामचंद्र चिन्नेकर यांनी सुध्दा रस्ता अडवला आहे. सदरील गटात लक्ष्मीताई रेणुका यलम्मा संस्था, बोरुळ अंतर्गत यलम्मा देवीचे भव्य मंदिर आहे. या मंदिरात दर्शनासाठी अनेक भाविक ये जा करत असतात. त्यांचा मुद्दाम रस्ता अडवले जात आहे. तरी पुर्वीपासुन असलेला रस्ता खुला करुन मिळावा, म्हणुन दक्षिणचे तहसिलदार किरण जमदाडे यांच्याकडे लक्ष्मी रामचंद्र चिन्नेकर, वनमाला राजकुमार चिन्नेकर, मयुर परमेश्वर बाईटपल्ली, सावित्री शिवप्पा चिन्नेकर, सर्वजण रा. बोरुळ यांनी लेखी निवेदन दिले आहे.

ही  बातमी  वृत्तसंकलित केली आहे संपादक  सागर कोळी यांनी

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक सागर कोळी 

97636 21820 

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल



Post a Comment

0 Comments