Advertisement

Breaking News
Loading...

माजी आमदार दिलीप माने यांच्या उपस्थितीत मंद्रुप येथील जामा मस्जिद येथे इफ्तार पार्टी संपन्न...

 माजी आमदार दिलीप माने यांच्या उपस्थितीत मंद्रुप येथील जामा मस्जिद येथे इफ्तार पार्टी संपन्न...

रमजान हे पवित्र पर्व मानले जाते. मुस्लीम बांधव रमजानमध्ये संपूर्ण महिना अर्थात तीस दिवस उपवास करतात. सर्वधर्मीय एकत्र येऊन इफ्तार पार्टीत गुण्यागोविंदाने सहभागी होतात. यातून सर्वधर्म समभाव दिसून येतो. हिंदू-मुस्लीम भाईचारा महत्त्वाचा असल्याची भावना माजी आमदार दिलीप माने यांनी इफ्तार पार्टीप्रसंगी व्यक्त केले.

कॉंग्रेस अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष अफजल शेख यांनी शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मंद्रूप येथील जामा मस्जिद येथे इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. 

यावेळी सोलापूर जिल्हा दुध संघाचे संचालक सुरेश हसापुरे यांनी हिंदू-मुस्लीम भाईचारा कायम असावा अशी अपेक्षा व्यक्त करीत मुस्लीम बांधवांसह सर्वांना रमजान सणाच्या शुभेच्छा दिल्या. 

यावेळी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष हरिष पाटील, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष वसिम पठाण, माजी कृषी सभापती अप्पाराव कोरे, सरपंच अनिता कोरे, उपसरपंच भगवान व्हनमाने, माजी उपसरपंच रमेश नवले, पिर शेख साहेब ट्रस्टचे अध्यक्ष शब्बीर मुल्ला, मोतीलाल राठोड, अप्पासाहेब काळे, गंगाधर बिराजदार, माजी सरपंच नजीर आवटे, माजी सरपंच बक्षूभाई मुल्ला, सलीम शेख, लक्ष्मण सुतार, महादेव टेळे, धनंजय म्हेत्रे, निखिल देशपांडे, बाबूलाल निगेवान, उमाशंकर रावत, अप्पासाहेब शिळ्ळे, मलकारी शेंडगे, संतोष बरूरे, संदीप मेंडगुदले, राम पवार, सिद्धू खरात, दानेश शेख, महमद शेख यांच्यासह हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.



या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचाक्षरी स्वामी यांनी तर आभार मुबारक मोमीन यांनी मानले.

ही बातमी वृत्तसंकलित केलीआहे

संपादक सागर कोळी यांनी...

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क:

संपादक सागर कोळी

97636 21820

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल

Post a Comment

0 Comments