Advertisement

Breaking News
Loading...

कोंबडवाडी येथे दारूच्या नशेत पतीने लाकडाने केलेल्या मारहाणीत पत्नी गंभीर जखमी; सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू

 कोंबडवाडी येथे दारूच्या नशेत पतीने लाकडाने केलेल्या मारहाणीत पत्नी गंभीर जखमी; सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू


मोहोळ तालुक्यातील कोंबडवाडी येथे संगीता सचिन बेगे (वय 45), रा. कोंबडवाडी, ता. मोहोळ यांना दि. 4 एप्रिल 2024 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी दारूच्या नशेत पती सचिन बेगे याने लाकडाने जबर मारहाण केली. या मारहाणीत संगीता बेगे यांच्या डोक्यात गंभीर जखम आणि सर्वांगास मुका मार लागला. त्यांना मोहोळ येथील सरकारी दवाखान्यात उपचार करवून रेफरने पुढील उपचारासाठी दि. 5 एप्रिल रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास मुलगा सुमित यांनी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती सिव्हिल पोलिसांकडून रविवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी...

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क:

संपादक सागर कोळी

97636 21820

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल



Post a Comment

0 Comments