Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मुळेगाव तांडा शिवारात मालवाहतुक छोटा हत्तीने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकावर तालुका पोलीसात गुन्हा दाखल

 मुळेगाव तांडा शिवारात मालवाहतुक छोटा हत्तीने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकावर तालुका पोलीसात गुन्हा दाखल


मालवाहतुक छोटा हात्ती या वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एकजण गंभीर जखमी तर एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा शिवारातील राज हॉटेल समोरून हैद्रबाद ते सोलापुर जाणा-या हायवे रोडवर घडली. मालवाहतूक छोटा हत्ती त्याचा क्र. एम. एच. 13/डी./6705 च्या अज्ञात चालकाने दि. 2 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास त्याच्या ताब्यातील मालवाहतुक वाहन भरधाव वेगाने चालवून दुचाकी त्याचा क्र एम. एच. 13/एल/9188 या मोटरसायकलवर डबलसीट जाणारे फिर्यादीचे वडील व त्यांच्या मित्राला पाठीमागुन जोराची धडक दिली. त्या धडकेत शब्बीर हुशेनवाशा पठाण (वय 45), रा. बोरामणी यांना गंभीर जखमी करून व फिर्यादीचे वडील मलिक हब्बु शेख (वय 40), रा. बोरामणी यांना गंभीर जखमी करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत झाला आहे. तसेच मोटरसायकलचे नुकसान करून अपघाताची माहिती न देता निघुन गेला आहे. इब्राहिम मलिक शेख, (वय 19), रा. बोरामणी, ता. द. सोलापूर यांनी तालुका पोलीसात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चालका विरुध्द तालुका पोलीसात दि. 6 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार लोखंडे हे करीत असल्याची माहिती रविवारी ग्रामीण पोलीस दलाकडून प्रेसनोटच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी...

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क:

संपादक सागर कोळी

97636 21820




हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल

Post a Comment

0 Comments