Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

आहेरवाडी येथे 'तू तुझ्या नवर्‍याबरोबर नांदू नको' असे म्हणून एका महिलेने आणि पतीने पत्नीस केली लाथाबुक्क्याने जबर मारहाण; वळसंग पोलीसात गुन्हा दाखल

 आहेरवाडी येथे 'तू तुझ्या नवर्‍याबरोबर नांदू नको' असे म्हणून एका महिलेने आणि पतीने पत्नीस केली लाथाबुक्क्याने जबर मारहाण; वळसंग पोलीसात गुन्हा दाखल


दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी येथे 'तू तुझ्या नवर्‍याबरोबर नांदू नको' असे म्हणून एका महिलेने आणि पतीने पत्नीला लाथाबुक्क्याने जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत संगीता बिराप्पा पुजारी, (वय 40), रा. आहेरवाडी, ता. द. सोलापूर यांनी वळसंग पोलीसात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार दि. 11/04/2024 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास फिर्यादी घरी असताना फिर्यादीचा पती बिराप्पा माळप्पा पुजारी (वय 36), पार्वती भैरप्पा भैरगुंडे (वय 37), दोघेही रा. आहेरवाडी, ता. द. सोलापूर यांनी घरी येवून तु वेथे का आली. तु माहेरी निघून जा, मी तुझ्या नव-याचे कपडे धुवणे, जेवणखाण करुन देते, तु यांच्या बरोबर नांदु नको असे म्हणून नवरा व पार्वती बहिरगुंडे यांनी फिर्यादीला हाताने, लाथाबुक्याने मारहाण केली. फिर्यादीने गावातील भिमराव पाटील व दीर जकप्पा माळप्पा पुजारी यांना मारहाण करत असलेबाबत फोनवरुन हकीकत सांगितले असता, त्यावेळी नवर्‍याने तु कोणालाही सांग तू माझी बायको नाही, असे म्हणून फिर्यादीच्या गळ्यातील ₹ 20 हजार किंमतीचे अर्धा तोळ्याचे सोन्याचे मंगळसुत्र बळजबरीने हिसकावून घेतले. तसेच पार्वती बहिरगुंडे हीने फिर्यादीची पिशवी उचकटून पिशवीमधील दोन हजार चारशे रुपये बळजबरीने काढून घेतले. तसेच दोघांनी फिर्यादीला घराचाहेर हाकलून दिले. म्हणून दोघांवर वळसंग पोलीसात दि. 11 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास एएसआय निंबाळे हे करीत असल्याची माहिती ग्रामीण पोलीस दलाकडून शुक्रवारी प्रेसनोटच्या माध्यमातून पत्रकारांना देण्यात आली आहे.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी…

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक सागर कोळी 

97636 21820 

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्ट





Post a Comment

0 Comments