Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

देगाव वाळुज येथे 'मित्राला आणखीन चिकन का वाढत नाही, म्हणून पतीने पत्नीच्या पोटात चाकू खूपसले; मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल

 देगाव वाळुज येथे 'मित्राला आणखीन चिकन का वाढत नाही, म्हणून पतीने पत्नीच्या पोटात चाकू खूपसले; मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल


मित्रासोबत जेवताना 'मित्राला आणखीन चिकन का वाढत नाही' म्हणून पतीने पत्नीच्या पोटात चाकु खुपसून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मोहोळ तालुक्यातील देगाव वाळुज येथे घडली. याबाबत यशोदा चक्रधर काळे (वय 65),रा. देगाव बाळूज, ता. मोहोळ, सध्या रा. सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल ट्रॉमी आयसीयु यांनी मोहोळ पोलीसात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 10 एप्रिल 2024 रोजी दुपारी 1/30 वाजेच्या सुमारास देगाव येथील राहत्या घरी देगाव येथे फिर्यादीचा पती चक्रधर जुगरास काळे याने त्याच्या व त्याच्या मित्रासाठी जेवनासाठी आणले होते. चिकन व भाकरी करून ताटे वाढून दिले असता आरोपी पतीने मित्रांना आणखीन चिकन का वाढत नाही असे म्हणुन काठीने, लोखंडी नळीने मांडीवर, पोट्र्यावर मारुन शिवीगाळ करुन रागाच्या भरात चाकु पोटात खुपसुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीचा दि. 11 एप्रिल रोजी सिव्हिल व्हाॅस्पिटल येबाब नोंदवून आरोपी पती चक्रधर काळे याच्या विरुद्ध मोहोळ पोलीसात दि. 11 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पीएसआय कर्णेवाढ हे करीत असल्याची माहिती ग्रामीण पोलीस दलाकडून शुक्रवारी प्रेसनोटच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी…

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक सागर कोळी 

97636 21820 

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्ट





Post a Comment

0 Comments