Advertisement

Breaking News
Loading...

घरफोडी करणारे आंतरराज्यीय दोन सराईत चोरटे जेरबंद..! 13.3 तोळे सोने व 1.804 किलो चांदी असा एकूण ₹20,00,180 किमतीचा मुद्देमाल हस्तगत... सोलापूर शहर गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी...

 




सोलापूर हॅलो रिपोर्टर न्यूज: विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीत एका रात्रीत तीन घरफोड्यांचे प्रकार घडताच, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेला तातडीने तपास आदेश दिले होते. गुन्हे शाखेचे स.पो.नि. शैलेश खेडकर यांच्या पथकाने अवघ्या काही तासांत तांत्रिक तपास, सीसीटीव्ही विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे दोन आंतरराज्यीय सराईत चोरट्यांना जेरबंद केले.

जप्त मुद्देमाल :

13.3 तोळे सोन्याचे दागिने

1 किलो 804 ग्रॅम चांदीचे दागिने

एकूण किंमत : ₹20,00,180

घटनांचा तपशील:

(अ) फिर्यादी सतिश शिवप्पा सोलापूरे (वय 62) यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी ₹4,87,800 किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले.

विजापूर नाका पो.स्टे येथे गुन्हा क्रमांक 577/2025 भा.दं.सं. 2023 कलम 331(4), 305(ए) नुसार गुन्हा दाखल.

(ब) त्याच रात्री एल. श्रवणकुमार लगुन (वय 39) यांचेही घर फोडून सुमारे ₹19,33,000 किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेले.

(क) सौ. पूजा सचिन जाधव यांच्या घरात चोरीचा प्रयत्न.

तिन्ही घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

तांत्रिक तपासातून सुराग:

स.पो.नि. शैलेश खेडकर व गुन्हे शाखा पथकाने घटनास्थळाला भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहिती तपासून, गुन्हा सराईत आंतरराज्यीय टोळीने केल्याचे निश्चित केले.

गोपनीय बातमीवरून पथकाने समर्थ सोसायटी, ए.जी. पाटील कॉलेज परिसरात सापळा लावून दोन्ही चोरट्यांना पकडले.

अटक आरोपी:

1. राघवेंद्र उर्फ रघू उर्फ नागराज शंभू नाईक (वय 32), मुळ रा. होन्नावर, जि. कारवार, कर्नाटक

2. लक्ष्मण उर्फ लकी मारुती नाईक (वय 28), मुळ रा. बेळगाव, कर्नाटक

अटक केल्यानंतर त्यांनी तीनही घरफोड्यांची कबुली दिली.

पथकाची उल्लेखनीय कामगिरी:

ही कारवाई खालील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली :

मा. एम. राजकुमार, पोलीस आयुक्त

डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त, गुन्हे

श्री. राजन माने, सहा. पोलीस आयुक्त

श्री. अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा

पथकातील अधिकारी व अंमलदार :

स.पो.नि. शैलेश खेडकर, संदीप जावळे, विनोद रजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, राजेश मोरे, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, महेश रोकडे, इब्राहिम शेख, चालक बाळासाहेब काळे, घोरपडे तसेच सायबर पो.स्टेचे प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड, रतिकांत राजमाने.

शहरातील सलग घरफोड्यांना चुटकीसरशी उकल देत गुन्हे शाखेने पुन्हा एकदा आपली दक्षता आणि वेग दाखवून दिला आहे.


न्यायालयीन प्रक्रिया: 
अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना दिनांक 01 डिसेंबर 2025 पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. पोलीसांचा पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments