Advertisement

Breaking News
Loading...

तालुका कृषी अधिकारी ₹ 8 हजाराची लाच घेताना रंगेहात; एसीबीची धडक कारवाई...


 

सोलापूर ( हॅलो रिपोर्टर न्यूज) :शेतकऱ्यांच्या सरकारी कृषी योजनांच्या मंजुरीसाठी १०,००० रुपयांची लाच मागणाऱ्या तालुका कृषी अधिकाऱ्याला अँटी करप्शन ब्युरो, सोलापूर पथकाने ८,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

आरोपी धनंजय सुभाष शेटे (वय वर्षें ३१), पद – तालुका कृषी अधिकारी (वर्ग-२), उत्तर सोलापूर, हे महा-डीबीटी पोर्टलवरील कृषी अवजार मंजुरीसाठी तक्रारदाराकडून लाच मागत होते. तडजोडीनंतर ८,००० रुपये घेण्याचे ठरले होते.

तक्रारदाराच्या तक्रारीनंतर आज २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सापळा रचण्यात आला. कारवाईदरम्यान आरोपीने कार्यालयातील टेबलवरील कागदांमध्ये लपवून ठेवलेली लाच रक्कम स्वीकारताच एसीबी पथकाने त्याला तत्काळ पकडले. या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कारवाईत सहभागी अधिकारी:

श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, एसीबी पुणेश्री

श्री. अजित पाटील, अपर पोलीस अधीक्षक, एसीबी पुणे

श्री. प्रशांत चौगुले, पोलीस उपअधीक्षक, एसीबी सोलापूर

पीआय शैलेश पवार, पीआय रविंद्र लांभाते व एसीबी सोलापूरचे पथक

एसीबीचे आवाहन:


शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी लाच मागत असल्यास त्वरित तक्रार करावी.

📞 टोल फ्री: 1064
📲 व्हॉट्सअॅप: 9823225465
🌐 वेबसाईट: acbmaharashtra.gov.in


Post a Comment

0 Comments