Advertisement

Breaking News
Loading...

सादेपूर येथे आजाराला कंटाळून वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या...

 


प्रतिनिधी : दक्षिण सोलापूर, सादेपूर (ता. दक्षिण सोलापूर) येथे आजाराने त्रस्त झालेल्या एका वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी घडली. सुमारे चार वाजण्याच्या सुमारास उघड झालेल्या या प्रकाराने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.


मृत व्यक्तीची ओळख मलकाप्पा बसाप्पा कोळी (वय ६६, रा. सादेपूर) अशी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मलकप्पा कोळी हे काही काळांपासून आजारपणाने त्रस्त होते. वाढत्या आजारामुळे नैराश्यात गेल्याने त्यांनी अखेर टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.


शुक्रवार दुपारी ते घरातून निघून गेले आणि दावल मलिक दर्ग्याजवळील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. परिसरातील काही ग्रामस्थांच्या नजरेस हा प्रकार पडताच त्यांनी तातडीने सादेपूर येथे ही माहिती पोहोचवली. त्यानंतर मलकप्पा यांना खाली उतरवून मंद्रुप ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.


घटनेची नोंद मंद्रुप पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.


मलकप्पा यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. मुलगा सिद्राम कोळी यांनी पोलिसात फिर्याद नोंदवली असून पुढील तपास हवालदार राजकुमार गुरव करीत आहेत.


वृद्धाने घेतलेल्या या आत्महत्येने सादेपूर परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments