Advertisement

Breaking News
Loading...

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानचा मायेचा स्पर्श; बी.सी. बॉईज होस्टेलमध्ये सोलापुरी चादर वाटप...

 



सोलापूर प्रतिनिधी: श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या दशकपूर्ती निमित्त विद्यार्थ्यांना थंडीपासून संरक्षण देत मायेची ऊब देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. रेल्वे लाईन परिसरातील बी.सी. बॉईज होस्टेलमधील विद्यार्थ्यांना सोलापुरी चादरींचे वाटप करून प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपली. कडाक्याच्या थंडीमध्ये झालेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकताना दिसला.




प्रसिद्ध सोलापुरी चादर वाटप कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. होस्टेलमध्ये ५वी ते १०वीपर्यंतचे विद्यार्थी राहतात आणि थंडीचा कडाका वाढल्याने या उपक्रमाचे

महत्त्व अधिक जाणवले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा बार असोसिएशनच्या सचिव ॲड. मीरा प्रसाद सिंग, जिल्हा ग्रामीण यंत्रणाचे सहाय्यक लेखाधिकारी सूर्यकांत तोडकरी, होस्टेल व्यवस्थापक शंकर म्हमाणे तसेच श्रीमंतयोगी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट उपस्थित होते.




दहाव्या वर्धापनदिनानिमित्त हा प्रतिष्ठानचा सहावा सामाजिक उपक्रम आहे. विद्यार्थी दत्तक योजना, सेनेटरी पॅड वितरण, स्टील पाणी टाकी स्थापन, अन्नदान, दिवाळी फराळ वाटप, गोरगरीबांसाठी मदत अशा अनेक उपक्रमांची माहिती महेश कासट यांनी प्रास्ताविकातून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नर्मदा कनकी यांनी तर आभार प्रदर्शन विक्रम बायस यांनी केले.




उपक्रम सफल करण्यासाठी संतोष अलकुंटे, महेश ढेंगळे, प्रकाश आळंगे, दीपक करकी, गणेश माने, श्लोक सक्करगी, सौरभ लकडे, श्रीरंग रेगोटी, अभिजित व्हनकळस, अक्षता कासट, मनुश्री कासट, श्रेया लंचके, श्रीनिधी जाधव, शीला तापडिया, शुभांगी लंचके, सुजाता सक्करगी, अर्चना बंडगर, प्रियंका जाधव यांनी परिश्रम घेतले.




∆ “सोलापुरी चादर ही विद्यार्थ्यांसाठी खरी मायेची भेट” : ॲड. मीरा सिंग

“थंडीच्या दिवसात विद्यार्थ्यांना उब देणारी सोलापुरी चादर म्हणजे खरी मायेची भेट. श्रीमंतयोगी प्रतिष्ठानचे सामाजिक कार्य अत्यंत प्रशंसनीय आहे,” असे मत प्रमुख पाहुण्या ॲड. मीरा सिंग यांनी व्यक्त केले.


Post a Comment

0 Comments