बार्शी प्रतिनिधी: झारखंड येथील एका महिलेसह चार अल्पवयीन मुलांना तब्बल तीन वर्षे वेठबिगारीत अडकवून ठेवणाऱ्या आरोपीवर बार्शी तालुका पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे. कामगार आयुक्त कार्यालय, पोलीस विभाग व महसुल टीमच्या संयुक्त मोहिमेतून पिडीतांची सुटका करण्यात आली.
▶️ तक्रारीतून उघड झाला धक्कादायक प्रकार:
State Migrant Control Room, Jharkhand मार्फत आलेल्या तक्रारीनुसार सबीता देवी आणि तिची चार मुले —
• आयुष कुमार (10 वर्षे)
• पुनम कुमार (8 वर्षे 3 महिने)
• प्रिती कुमारी (5 वर्षे 4 महिने)
• पियुष कुमार (9 महिने)
हे सर्व झाकीर हुसेन इलाही सय्यद, रा. चुंब, बार्शी यांच्या घरात 01/09/2022 पासून जबरदस्ती कामाला लावले जात होते. धुणी-भांडी, शेण काढणे, झाडझोड यासारखी कामे करवून घेत असूनही कोणताही मोबदला दिला जात नव्हता आणि त्यांना मूळ गावी पाठवले जात नव्हते.*
▶️ संयुक्त पथकाची तत्काळ कारवाई:
कामगार आयुक्त कार्यालय सोलापूरचे निलेश यलगुंडे, त्यांचा स्टाफ, महसूल विभाग, ग्रामसेवक तसेच बार्शी तालुका पोलिसांनी मिळून झाकीर हुसेन यांच्या घराच्या मागील पत्राशेडमधून महिला आणि लहान मुलांची सुटका केली.
▶️ आरोपीवर गुन्हा दाखल:
बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. 362/2025 असा गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यात —
• BNS 2023 कलम 126(2), 127(4), 146
• बंद बिगार पद्धत अधिनियम 1976 चे कलम 16, 18
• बालकामगार अधिनियम 1986 चे कलम 14(1) व 3
अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
▶️ पिडीतांना सुरक्षितपणे झारखंडमध्ये रवाना:
सुटका केलेल्या महिला व बालकांना योग्य संरक्षणात सोलापूर येथून त्यांच्या मूळ गावी झारखंड येथे रवाना करण्यात आले.
▶️ वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन:
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर गुलमे हे करीत आहेत.

0 Comments