Advertisement

Breaking News
Loading...

मोहोळ येथे उपचारातील हलगर्जीपणाचा आरोप; 7 महिन्यांच्या गर्भवती डॉक्टरचा मृत्यू...

 


मोहोळ | हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी: आष्टी (ता. मोहोळ) येथील डॉक्टर दाम्पत्याच्या प्रकरणात उपचारातील गंभीर हलगर्जीपणाचा आरोप पुढे आला आहे. डॉ. अमित मधुकर व्यवहारे यांनी पंढरपूर व सोलापूर येथील तीन डॉक्टरांविरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दि. 29 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 7 महिन्यांच्या गर्भवती असलेल्या डॉ. सौ. प्रतिभा अमित व्यवहारे यांना अचानक रक्तस्त्राव सुरू झाला. पंढरपूर येथील मोहिते हॉस्पिटल व नंतर लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर स्थिती असूनही वेळेत आवश्यक उपचार न करता दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत आहे.

सकाळी उशिरा परिस्थिती बिघडल्यानंतर रुग्णास सोलापूर येथील यशोधरा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी उपचारास उशीर झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन जीवास धोका निर्माण झाल्याचे सांगितले. उपचार सुरू असतानाच दि. 1 डिसेंबर 2025 रोजी डॉ. प्रतिभा व्यवहारे यांचे निधन झाले.

उपचारात निष्काळजीपणा केल्यानेच पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत डॉ. अमित व्यवहारे यांनी संबंधित तीन डॉक्टरांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. प्रकरणाचा तपास मोहोळ पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments