Advertisement

Breaking News
Loading...

उपमुख्यमंत्री अजित पवार व उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद चंदनशिवे यांची सोलापूरच्या विविध प्रश्नांवर विधिमंडळात भेट...

 


सोलापूर शहर प्रतिनिधी (हॅलो रिपोर्टर न्यूज ): महाराष्ट्र राज्य विधिमंडळ येथे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार तसेच महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरातील विविध प्रलंबित प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.


या बैठकीत जनतेचे सेवक कार्यसम्राट आनंद (दादा) चंदनशिवे यांनी सोलापूर शहर व जिल्ह्यातील महत्त्वाच्या सार्वजनिक समस्या, विकासकामे आणि पायाभूत सुविधा विषयक मागण्यांवर सविस्तर चर्चा केली. संबंधित विभागांमार्फत त्वरित कार्यवाही व्हावी, यासाठी त्यांनी मुद्देसूद माहिती सादर केली.


याप्रसंगी नगरसेवक गणेश पुजारी, अविनाश शिंदे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या या भेटीत अनेक स्थानिक प्रश्नांवर सकारात्मक चर्चा होऊन लवकरच गती मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.


Post a Comment

0 Comments