Advertisement

Breaking News
Loading...

मल्लिकार्जुन कांबळे यांची हॅलो रिपोर्टर न्यूज चॅनेलच्या दक्षिण सोलापूर तालुका प्रतिनिधीपदी निवड...

 


दक्षिण सोलापूर प्रतिनिधी:  हॅलो रिपोर्टर न्यूज चॅनेलच्या दक्षिण सोलापूर तालुका प्रतिनिधी म्हणून मल्लू अण्णा नावाने तालुक्यात परिचित असणारे मल्लिकार्जुन कांबळे यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे. त्यांच्या मितभाषी स्वभावासोबतच दांडगा जनसंपर्क आणि तालुक्यातील प्रत्येक घटनेची तात्काळ माहिती मिळवण्याची क्षमता लक्षात घेऊन ही जबाबदारी त्यांना सोपवण्यात आली आहे.

मल्लिकार्जुन कांबळे यांच्या निवडीबाबत दक्षिण सोलापूर तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्हा आणि शेजारील कर्नाटक राज्यातूनही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, हॅलो रिपोर्टर न्यूज चॅनेलच्या नावाचा गैरवापर करून दक्षिण सोलापूर तालुक्यात काही व्यक्ती पत्रकार तथा संपादक असल्याची बतावणी करणे, दमदाटी करणे, खंडणीवसुलीचा प्रयत्न करणे आणि दबाव तंत्र वापरणे असे प्रकार सुरू असल्याची माहिती चॅनेल प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे.

हॅलो रिपोर्टर न्यूज चॅनेलच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे की, “दक्षिण सोलापूर तालुक्यात मल्लिकार्जुन कांबळे उर्फ मल्लू अण्णा यांच्याशिवाय चॅनेलचा कोणताही पत्रकार किंवा संपादक अधिकृतरित्या नियुक्त केलेला नाही.”

कोणतीही व्यक्ती हॅलो रिपोर्टर न्यूज चॅनेलच्या नावाने त्रास देत असेल किंवा गैरप्रकार करत असल्यास तात्काळ मुख्य संपादक प्रा. डॉ. राजदत्त रासोलगीकर यांच्या मो. 9923393329 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात संबंधिता विरुद्ध तक्रार दाखल करावी, असे आवाहन हॅलो रिपोर्टर न्यूज चॅनेल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

— हॅलो रिपोर्टर न्यूज चॅनेल प्रशासन...

Post a Comment

0 Comments