Advertisement

Breaking News
Loading...

महादेव कोळी समाजाला दिलासा; जटाळे परिवाराच्या लढ्याला उच्च न्यायालयात यश...

 


छत्रपती संभाजी नगर | हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी:

महादेव कोळी अनुसूचित जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्रासंदर्भात महादेव कोळी समाज बांधवांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जटाळे परिवाराच्या जात वैधता प्रकरणात मा. उच्च न्यायालयाने महत्त्वाची दखल घेत समाजाच्या बाजूने अनुकूल निर्णय दिला असून, या प्रकरणामुळे संपूर्ण महादेव कोळी समाजासाठी आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे.


या प्रकरणात आदरणीय ॲड. श्री. सुशांत चंद्रकांत येरमवार (जिंतूरकर) साहेब यांनी सखोल अभ्यास करत, ठणकावून आणि प्रभावीपणे जटाळे परिवाराची बाजू मांडली. दिनांक 17 डिसेंबर व 20 डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान मा. उच्च न्यायालयाने जटाळे परिवारास बिनशर्त जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने, दीर्घकाळ सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्याला यश मिळाले.


या महत्त्वपूर्ण यशाबद्दल जटाळे परिवाराच्या वतीने आज ॲड. सुशांत येरमवार साहेब यांची त्यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेऊन सत्कार करण्यात आला. यावेळी समाजातील अनेक मान्यवर, कार्यकर्ते व बांधव उपस्थित होते.


जटाळे परिवाराने यावेळी भावना व्यक्त करताना सांगितले की, “ॲड. येरमवार साहेब हे आमचा विषय केवळ केस म्हणून न पाहता, आमच्या जमातीच्या न्यायासाठी आत्मीयतेने लढले. प्रत्येक सुनावणीवेळी त्यांनी आम्हाला विश्वास दिला आणि अखेर न्याय मिळवून दिला.”


या निर्णयामुळे जटाळे परिवारासह सोलापूर जिल्ह्यातील अनेक महादेव कोळी समाज बांधवांना शिक्षण, नोकरी व विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. समाज बांधवांनी योग्य कायदेशीर मार्गदर्शन घेऊन आपल्या हक्कासाठी लढावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.


या यशामुळे महादेव कोळी समाजाचा आत्मविश्वास अधिक बळकट झाला असून, न्यायालयीन प्रक्रियेतून न्याय मिळू शकतो, हा विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.



Post a Comment

0 Comments