सोलापूर (ग्रामीण) | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे:
पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण मा. श्री. अतुल वि. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव शिवारात असलेल्या पुष्पक ऑर्केस्ट्राबार वर मोठी कारवाई करत तब्बल 70 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मा. पोलीस अधीक्षक यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदर ऑर्केस्ट्राबारमध्ये महिलांकडून तोकडे कपडे परिधान करून डीजेच्या तालावर बिभत्स व अश्लील नृत्य सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने विशेष पथकास कारवाईचे आदेश देण्यात आले.
विशेष पथकाने मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीतील कंदलगाव येथील पुष्पक ऑर्केस्ट्राबारवर छापा टाकला असता, 12 बारबाला अश्लील हावभाव व नृत्य करताना, तर 55 ग्राहक नृत्यांगनांवर नोटा सदृश कुपन उधळताना व अश्लील हावभाव करताना आढळून आले.
याप्रकरणी ऑर्केस्ट्राबारचा चालक भारत राजाराम तांबे (रा. शिवाजीनगर, बाळे) व मालक रोहित पांडुरंग चव्हाण (रा. सोलापूर) यांच्यासह एकूण 70 जणांविरुद्ध मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणात महाराष्ट्र हॉटेल, उपगृहे व मद्यपान कक्ष (बाररूम) मधील नृत्य व अश्लील नृत्यावर प्रतिबंध अधिनियम 2016 चे कलम 3, 8 (1)(2)(4) तसेच भारतीय न्याय संहिता कलम 296(3)(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान ५६ लाख १ हजार ८९० रुपयांचे डीजे साहित्य, ऑर्केस्ट्राबारमधील साहित्य, वाहने व मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी:
सदरची कारवाई मा. श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. राहुल अतराम, पोलीस निरीक्षक श्री. दशरथ वाघमोडे, सहा. पोलीस निरीक्षक श्री. अनिल सनगल्ले, सपोनि मनोज पवार, पोहेकॉ बिरजदार, पोहेकॉ गोरे, पोकॉ जाधव, पोकॉ गणेश पाटील, महिला पोकॉ धनश्री हुळळे, महिला पोकॉ राऊत तसेच मंद्रुप पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांच्या सहभागातून यशस्वीरीत्या पार पडली.

0 Comments