मोहोळ | हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी: मोहोळ तालुक्यातील शिरापूर परिसरातील घरकुल योजनेअंतर्गत मंजूर लाभार्थ्यांसाठी घरबांधणीसाठी आवश्यक वाळू प्रशासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर वाळू ६०० रुपये प्रति ब्रास दराने मिळणार असून वाहतूक भाडे व इतर भरणा संबंधित लाभार्थ्यांकडून स्वतंत्रपणे घेतला जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
ही सुविधा फक्त घरकुल लाभार्थ्यांसाठीच मर्यादित राहणार असून इतर कोणालाही वाळू दिली जाणार नाही. त्यामुळे शिरापूरमधील सर्व घरकुल लाभार्थ्यांनी लवकरात लवकर सामाजिक कार्यकर्ते श्री. अनिल आबाजी पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वेळीच संपर्क साधल्यास प्रशासनाकडून मंजूर दरात वाळू मिळण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
📞 संपर्क क्रमांक : ९६५७१६६४७५

0 Comments