Advertisement

Breaking News
Loading...

बोरामणी गटात धनेश अचलारे यांची वादळी एन्ट्री! काँग्रेस उमेदवाराचा जाहीर पाठिंबा, विरोधक हादरले...

 



कासेगाव | हॅलो रिपोर्टर न्यूज | निवडणूक विशेष वार्ताकंन डॉ राजदत्त रासोलगीकर :


दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी जिल्हा परिषद गटात शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे उमेदवार धनेश सुभाष अचलारे यांना गावोगावातून मतदारांचा वाढता आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, बोरामणी गटात त्यांच्या विजयाची चर्चा जोर धरू लागली आहे.

 


शुक्रवारी कासेगाव येथे होम-टू-होम प्रचार करत धनेश अचलारे यांनी मतदारांच्या थेट गाठीभेटी घेत त्यांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या. या प्रचारादरम्यान कासेगाव पंचायत समिती गणातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अप्पा धनके यांनी शिवसेना (शिंदे गट) चे उमेदवार धनेश अचलारे यांना जाहीर पाठिंबा दिल्याची घोषणा केली.


या अनपेक्षित पण महत्त्वपूर्ण पाठिंब्यामुळे बोरामणी गटातील राजकीय समीकरणे बदलली असून, धनेश अचलारे यांची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे.

 


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या आशीर्वादाने आणि मतदारांच्या सहकार्याने आपण नक्कीच विजयी होऊ, असा ठाम आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला.

 


दरम्यान, काँग्रेसचे उमेदवार अप्पा धनके यांनीही आपल्या मनोगतातून विकासाभिमुख नेतृत्वासाठी एकत्र येण्याची गरज अधोरेखित केली.

 


या प्रसंगी बोरामणी गटातील ग्रामस्थ, युवक, शिवसेना युतीचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 




Post a Comment

0 Comments