मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | स्पेशल रिपोर्टींग डॉ राजदत्त रासोलगीकर :
मंद्रूप पंचायत समिती गणातील भाजपचे उमेदवार मळसिद्ध मुगळे यांनी कार्यकर्ते व मतदारांना शांतचित्ताने, कोणताही द्वेषभाव न ठेवता मतदान प्रक्रिया पार पाडण्याचे आवाहन केले. आपल्या सोबत लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या दोघेही असल्यामुळे काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, असेही त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले. यावेळी मंद्रूप जिल्हा परिषद गटातील उमेदवार सोनाली प्रशांत कडते याही उपस्थित होत्या.
ते म्हणाले की, मागील तीन वर्षांच्या कालावधीत विरोधकांनी कोणतीही ठोस विकासकामे केली नाहीत. उलट समाजात जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले. मात्र आमदार सुभाष देशमुख आणि युवा नेते मनिष देशमुख यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने विकासकामांच्या जोरावर विरोधकांना योग्य धडा शिकवायचा आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाताने निधन झाल्याच्या दुर्दैवी घटनेमुळे आज नियोजित असलेली प्रचार सभेची सुरुवात टाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दुःखद घटनेबद्दल त्यांनी तीव्र शोक व्यक्त केला.
या वेळी भाजपचे कार्यकर्ते तसेच मतदार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments