Advertisement

Breaking News
Loading...

दक्षिण सोलापूर पत्रकार असोसिएशनच्या अध्यक्षपदी शिवराज मुगळे; उपाध्यक्षपदी मधुकर राठोड, सचिवपदी मल्लिकार्जून कांबळे यांची एक मताने निवड...

 


मंद्रूप | तालुका प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे: दक्षिण सोलापूर पत्रकार असोसिएशनची बैठक आज रविवार, दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ही बैठक असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष रेवणसिद्ध मेंडगुदले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.


या बैठकीत संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची निवड एकमताने करण्यात आली. त्यानुसार अध्यक्षपदी शिवराज मुगळे, सचिवपदी मल्लिकार्जुन कांबळे, उपाध्यक्षपदी मधुकर राठोड तर कार्याध्यक्षपदी अभिजीत जवळकोटे यांची  तसेच सहसचिवपदी आरिफ नदाफ यांची तर खजिनदारपदी श्रीकांत हाले यांची नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली. सदस्य म्हणून नारायण घंटे, मोहम्मद शेख, इरण्णा गंचीनगोटे, आनंद बिराजदार, बिसलसिद्ध काळे, प्रभू पुजारी, शिवय्या स्वामी, प्रमोद जवळकोटे,  रितेश मेंडगुदले, रमेश वाघमोडे यांची निवड  करण्यात आले आहे.


संघटनेचे वरिष्ठ मार्गदर्शक अमोगसिद्ध मुंजे, विनोद कामतकर, नारायण चव्हाण, नंदकुमार वारे, महासिद्ध साळवे यांची निवड करण्यात आली. बैठकीदरम्यान संघटनेची भावी कार्यपद्धती, पत्रकारांच्या हिताचे प्रश्न तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील पत्रकारांनी एकत्रितपणे काम करण्याबाबत सकारात्मक विचारणा व चर्चा झाली. नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रेवणसिद्ध मेंडगुदले यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments