Advertisement

Breaking News
Loading...

अट्टल घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; ₹ ३.४४ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत... सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी...


सोलापूर (ग्रामीण) | हॅलो रिपोर्टर न्यूज: ६ जानेवारी २०२६

स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांनी केलेल्या प्रभावी कारवाईत अट्टल घरफोडी करणाऱ्या आरोपीस जेरबंद करण्यात आले असून त्याच्याकडून एकूण ३,४४,००० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.



मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय जगताप यांच्या सूचनेनुसार गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष पथक कार्यरत होते. या दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे व त्यांच्या पथकाने बार्शी शहर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार अक्षय मारोती शिंदे (वय २५), रा. शिवाजी चौक, आडत लाईन, निलंगा, जि. लातूर हा बार्शी रेल्वे स्टेशन परिसरात असल्याचे समजताच पथकाने तात्काळ कारवाई करून त्यास ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने बार्शी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हे र. क. ५४९/२५ सह एकूण चार घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.


आरोपीकडून २१ ग्रॅम सोन्याचे व २० ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण ३.४४ लाख रुपये (चालू बाजारभावानुसार) किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास बार्शी शहर पोलीस करीत आहेत.


ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रितम यावलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत गायकवाड, पोहेकॉ सलीम बागवान, तसेच रवी माने, अश्विनी गोटे, अनवर अत्तार, विनायक घोरपडे, मनोज राठोड, सूरज रामगुडे, अर्चना मस्के, दिपाली जाधव यांच्या पथकाने बजावली.


पाहिजे आरोपी:

अनिल मनोहर शिंदे, रा. मौजे वाळूज देगाव, ता. मोहोळ, जि. सोलापूर


Post a Comment

0 Comments