मंद्रूप | प्रतिनिधी आरिफ नदाफ — दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सेवालाल नगर, मंद्रूप येथे शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले. यावेळी सर्वानुमते व टाळ्यांच्या गजरात श्री. रेवनसिद्ध श्रीमंत शिंगडगाव यांची दुसऱ्यांदा अध्यक्षपदी, तर सौ. प्रियंका युवराज तिवारी यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
नवीन समितीच्या माध्यमातून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व शालेय उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अमन कोळी सर यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. राम विठ्ठल इंगळे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
अध्यक्षांच्या परवानगीने बैठकीची सांगता करण्यात आली.


0 Comments