बोरामणी | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे:
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांनी प्रेरित होत, शिवसेना सोलापूर जिल्ह्याच्या मार्गदर्शनाखाली बोरामणी जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचा दिमाखदार शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन श्रीश्रीश्री जगद्गुरू १००८ ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी (काशीपीठ) यांच्या दिव्य सान्निध्यात व आशीर्वादाने संपन्न झाले. कार्यक्रमाला माजी गृहराज्यमंत्री मा. श्री. सिद्धारामजी म्हेत्रे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
आज बुधवार, दि. ०७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथे पार पडलेल्या या सोहळ्यास नागरिक, शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. परिसर पूर्णपणे भगवेमय वातावरणाने न्हाऊन निघाला होता.
यावेळी जगद्गुरूंनी आपल्या मनोगतात शिवसेना नेते धनेश सुभाष आचलारे यांना आशीर्वाद देत त्यांच्या सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर मा. सिद्धारामजी म्हेत्रे यांनी बोरामणीकरांनी धनेश आचलारे यांचे हात बळकट करावेत, असे आवाहन केले. कार्यक्रमात मा. अमरदादा पाटील, मा. मनीष काळजे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत शिवसेनेच्या संघटन वाढीवर भर दिला.
या प्रसंगी मा. अमोलबापू शिंदे, मा. अमरदादा पाटील, मा. मनीष काळजे, मा. प्रथमेशदादा म्हेत्रे (नगराध्यक्ष, दुधनी), मा. रविनाताई राठोड (महिला जिल्हाप्रमुख), मा. बाबासाहेब पाटील (ता.प्रमुख), मा. योगिनाथ पाटील (ता.प्रमुख) यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या नव्या जनसंपर्क कार्यालयामुळे परिसरातील नागरिकांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फुटणार असून, शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसैनिक, नागरिक, मतदार बंधू-भगिनी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.







0 Comments