Advertisement

Breaking News
Loading...

मंद्रूप जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराचा उत्साहात शुभारंभ...

 



मंद्रूप| हॅलो रिपोर्टर न्यूज |प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे:

मंद्रूप जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ आज गुरुवारी मंद्रूप येथील ग्रामदैवत श्री मळसिद्धप्पा मंदिरात नारळ वाढवून विधीवत पूजा करून करण्यात आला.




या प्रसंगी ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे, अर्जुन टेळे, सरपंच पिरप्पा म्हेत्रे, माजी उपसरपंच मोतीराम चव्हाण, बाळासाहेब देशमुख, सुरेश पाटील, प्रदीप ख्याडे, तमण्णा पुजारी, कांतु ख्याडे, अमीर शेख यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



यावेळी बोलताना माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे म्हणाले, “विरोधकांना कधीही कमी लेखू नये. त्यांचा निर्णायक पराभव करण्यासाठी सर्वांनी जागरूक राहून संघटितपणे काम करणे गरजेचे आहे,” असे त्यांनी आवाहन केले.



दरम्यान, जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सना कौसर शेख आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार अनंत म्हेत्रे यांनी मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन उपस्थित मतदारांना केले.


प्रचाराच्या शुभारंभी उसळलेली गर्दी पाहता मंद्रूप परिसरात काँग्रेस पक्षाला प्रचंड जनाधार लाभत असल्याचे मत अनेकांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.




Post a Comment

0 Comments