मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | निवडणूक विशेष वृत्तांकन डॉ राजदत्त रासोलगीकर :
मंद्रूप जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील उमेदवारांच्या प्रचाराचा अंतिम टप्पा सध्या सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मंद्रूपचे ग्रामदैवत श्री. शेख वीर साहेब दर्गा येथे प्रचाराची सांगता करताना मंद्रूप पंचायत समिती गणातील भाजपचे अधिकृत उमेदवार मळसिद्ध मुगळे यांनी उपस्थितांना संबोधित केले.
यावेळी बोलताना त्यांनी कोणावरही टीका न करता केवळ विकासकामांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. “नकला करून नव्हे, तर जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवूनच मते मिळवता येतात,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. मंद्रूपच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक विचार आणि प्रामाणिक प्रयत्न गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या प्रसंगी मंद्रूप ज़िल्हा परिषद गटातील उमेदवार सोनाली कडते यांचे पती प्रशांत कडते यांच्या सह भाजपचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments