सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज |मुख संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (OSD) तथा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी आज शिवसेना जिल्हाप्रमुख अमर पाटील (अमर अण्णा पाटील) यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
या भेटीदरम्यान विविध संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली. पक्ष संघटन बळकटीकरण, वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून सुरू असलेल्या रुग्णसेवेचा आढावा तसेच आगामी उपक्रमांविषयी संवाद साधण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, रुग्णसेवक तसेच असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पक्षाच्या सामाजिक व सेवाभावी कार्याला अधिक गती मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.





0 Comments