Advertisement

Breaking News
Loading...

बहुजन शिक्षक महासंघातर्फे त्यागमूर्ती माता रमाई यांची १२८ वी जयंती उत्साहात साजरी...

 


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी :

महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्यावतीने त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची १२८ वी जयंती सोलापूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड व राज्य उपाध्यक्ष उपप्राचार्य प्रकाश शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यानंतर राज्य कोषाध्यक्ष नीलकंठ शिंगे, जिल्हाध्यक्ष प्रा. युवराज भोसले, रामन्ना गायकवाड, राजेंद्र सोरटे, पाटील जी.डी., प्रफुल्ल जानराव, प्रिया कदम, महानंदा शिंदे आदी मान्यवरांनी माता रमाईंच्या त्यागमय जीवनकार्यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस समाजभूषण रवी देवकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रफुल्ल जानराव यांनी तर आभार प्रदर्शन स्वप्नजा कसबे यांनी केले.

यावेळी महासंघाचे पुणे विभाग संपर्क प्रमुख दाऊत आतार, राष्ट्रीय चित्रकार विठ्ठल मोरे, आगतराव बनसोडे, सिद्धेश्वर भुरले, जी.डी. पाटील, शुभम इंगळे, भागवत देवकुळे, दादासाहेब कांबळे, नारायण काकेकर, ऍड. जितेंद्र राजगुरू, रोहित गायकवाड, एकोराम चौगुले, शिवानंद चौगुले, विजयकुमार गायकवाड, नीलकंठ अय्यर, सुनील स्वामी, कविता कदम, पृथ्वी शिंदे, प्रिस्किल्ला गायकवाड, बसवराज गब्बूर, संभाजी मुळे यांच्यासह इतर पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments