Advertisement

Breaking News
Loading...

पत्रकाराला धमकी दिल्याच्या आरोपावरून खासदार संजय दिना पाटील यांचा निषेध; 29 जूनला मंत्रालयासमोर अनिल पाटलांचा आंदोलनाचा इशारा...

 


मुंबई | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | भांडुपचे खासदार संजय दिना पाटील यांनी चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकार बांधवाला शिवीगाळ केल्याचा तसेच "बॉम्ब टाकून घर उडवून टाकू" अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला असून, या घटनेचा सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी अनिल आबाजी पाटील यांनी जाहीर निषेध केला आहे.


या संदर्भात प्रसिद्ध केलेल्या निवेदनात पाटील यांनी म्हटले आहे की, पत्रकारांना धमकी देण्याचा प्रकार अत्यंत गंभीर असून लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचवणारा आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन खासदार संजय दिना पाटील यांचा राजीनामा घ्यावा.

अन्यथा दिनांक 29 जून 2026 रोजी मुंबई येथील मंत्रालय अधिवेशनस्थळी आगळ्यावेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. संबंधित खासदारांनी पत्रकार बांधवांची जाहीर माफी मागेपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच प्रशासनाने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यास 29 जून रोजी होणाऱ्या आंदोलनातून निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस प्रशासनच जबाबदार राहील, असा इशाराही अनिल आबाजी पाटील यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments