Advertisement

Breaking News
Loading...

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर येळेगाव शाळेत ‘पट वाढवा’ अभियान; नवागतांचे जल्लोषात स्वागत...

 


येळेगाव | हॅलो रिपोर्टर न्युज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर – गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, येळेगाव येथे “पट वाढवा” अभियानासोबत नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. संपूर्ण शाळा परिसर आनंदी वातावरणाने भारून गेला होता.

या कार्यक्रमाला येळेगावचे सरपंच संजय लोणारी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शांतेश लोखंडे, उपाध्यक्ष दादाण्णा पोतदार, सदस्य श्रीकांत गोखले तसेच शिक्षणतज्ञ आकाश तिवारी यांची प्रमुख उपस्थिती होती.


इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यांना फुगे, गोड खाऊ आणि पुस्तके देऊन शालेय जीवनाची आनंददायी सुरुवात करून देण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी उभारलेल्या खास सेल्फी पॉईंटवर सर्वांनी सेल्फी काढत कार्यक्रमाचा आनंद लुटला.

नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना शाळेबद्दल आकर्षण निर्माण व्हावे यासाठी विविध खेळ आणि उपक्रम आयोजित करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगन्नाथ मैत्री व गौरीशंकर बिराजदार यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजकुमार म्हेत्रे यांनी केले. मुख्याध्यापक मल्लिनाथ राठोड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत शाळेचा पट वाढवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

कार्यक्रमास जगन्नाथ म्हेत्रे, श्वेता रजपूत, अनिता मरगूर, श्रीदेवी जमखंडीकर, विजया मोरे तसेच श्रीमती उळागड्डे यांची उपस्थिती होती.




Post a Comment

0 Comments