दक्षिण सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ राजदत्त रासोलगीकर |
टाकळी (ता. दक्षिण सोलापूर) येथे सुरू असलेल्या जुगारावर मंद्रूप पोलिसांनी धडक कारवाई करत 13 जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 चे कलम 12(अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत 70 हजार 500 रुपये रोख रक्कम, मोबाईल फोन आणि चार दुचाकी असा एकूण 4 लाख 53 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, 20 सप्टेंबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास टाकळी येथे आरोपी जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगारासाठी वापरलेले साहित्य तसेच विविध मोबाईल व दुचाकी जप्त करण्यात आल्या.
या प्रकरणी रोहन रमेश चौगुले, सिद्धू तोडी कट्टी, राजकुमार लक्ष्मण सगाई, महेश भीमाशंकर तांडोरे, गुंडुराव बंडू पोद्दार, सुभाष सिद्धाराम कुंभार, उमेश इरगोंडा बिराजदार, बसवराज जन्म, लक्ष्मण सिद्राम वंजारी, राजशेखर गायकवाड, रवी बगले, शिवानंद लक्ष्मण घोडके आणि सचिन मेढेदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्व आरोपींना BNSS कलम 35(3) अन्वये नोटीस देण्यात आली असून अटक करण्यात आलेली नाही.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही G. PSI पाटील यांनी केली असून तपास PSI राज डांगे करीत आहेत.
जप्त मुद्देमाल
रोख रक्कम – ₹70,500
विविध कंपन्यांचे मोबाईल फोन
हिरो HF Deluxe – 2
हिरो Splendor Plus – 1
हिरो HF Deluxe – 1
एकूण मुद्देमाल – ₹4,53,000
मंद्रूप पोलिसांच्या या कारवाईमुळे टाकळी परिसरातील अवैध जुगार व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.


0 Comments