सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : समाजकार्य, शिक्षण आणि जनसेवा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष तथा बहुजन शिक्षक पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. अण्णासाहेब भालशंकर यांना “लोकमत एक्सलन्स अवॉर्ड 2025-26” प्रदान करून गौरविण्यात आले.
हा दिमाखदार पुरस्कार सोहळा शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता सोलापूर शहरातील गुजराती भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडला. नवनियुक्त खासदार ज्योतीताई वाघमारे यांच्या हस्ते अण्णासाहेबांना सपत्नीक हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी पोलीस उपायुक्त गोहर हसन, जिल्हाधिकारी एस. कार्तिकी, लोकमत परिवारातील मान्यवर, पुरस्कार विजेते आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण सभागृहात टाळ्यांच्या गजरात आणि उत्साही वातावरणात हा गौरव सोहळा रंगला.
मा. अण्णासाहेब भालशंकर यांनी केलेले निस्वार्थ समाजकार्य, शिक्षण क्षेत्रातील योगदान आणि सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी घेतलेले अथक प्रयत्न यामुळेच त्यांना हा सन्मान मिळाला आहे. त्यांचे कार्य केवळ प्रेरणादायी नसून समाजात सकारात्मक बदल घडवणारे ठरत आहे.
मा. अण्णासाहेब भालशंकर यांचे कार्य हे केवळ पदापुरते मर्यादित नसून त्यांनी समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षण आणि समाजसेवा या दोन्ही क्षेत्रात त्यांनी उभारलेले कार्य आज अनेकांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.
त्यांच्या या सन्मानामुळे सोलापूर जिल्ह्याचे नावही उंचावले असून स्थानिक पातळीवर आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हा गौरव भविष्यातील कार्यासाठी नवी ऊर्जा देणारा ठरेल, यात शंका नाही. त्यांच्या पुढील वाटचालीतही ते असेच समाजहिताचे कार्य करत राहोत, हीच सर्वांची अपेक्षा आहे. 🙏💐
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत...!




0 Comments