Advertisement

Breaking News
Loading...

सिद्धेश्वर एक्सप्रेस न्यूज च्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त मंद्रूपमध्ये कुस्तीचा थरार; सामाजिक-धार्मिक कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद... नागेश कलागते व औदुंबर पाटील-वटवटे यांच्यातील लढत बरोबरीत सुटली...

 


मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | सिद्धेश्वर एक्सप्रेस न्यूजच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच श्री सिद्धेश्वर बहुउद्देशीय सामाजिक संस्था, मंद्रूप यांच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेले दोन दिवसीय सामाजिक, धार्मिक व क्रीडा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. दि. २५ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य जंगी कुस्त्यांच्या मैदानाने परिसरातील कुस्तीप्रेमींना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.

गाव तलाव शेजारील श्री मळसिद्धप्पा शेखासाहेब आखाड्यात सायंकाळी पार पडलेल्या या मैदानात राज्यातील नामांकित मल्लांनी दमदार झुंज दिली. मैदानातील सर्वाधिक चर्चेची लढत नागेश कलागते, सोलापूर आणि औदुंबर पाटील-वटवटे यांच्यात झाली. दोन्ही मल्लांनी अत्यंत चुरशीची व ताकदीची झुंज देत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. अखेर ही रंगतदार कुस्ती बरोबरीत सुटल्याने उपस्थितांमध्ये मोठी उत्सुकता व आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ३१ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २१ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ११ हजार रुपयांची रोख बक्षिसे ठेवण्यात आली होती. त्यामुळे मैदानाला विशेष आकर्षण प्राप्त झाले होते. तालुक्यासह परिसरातील हजारो नागरिकांनी मैदानाला उपस्थित राहून कुस्तीचा थरार अनुभवला.

दि. २६ मे रोजी शिवयोगेश्वर मठ, सकळेश्वर गल्ली, मंद्रूप येथे वीरशैव लिंगायत समाजासाठी लिंगदीक्षा कार्यक्रमही भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. हत्ताळी येथील श्रीपादेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते हा धार्मिक विधी पार पडला. यावेळी समाजबांधवांना मोफत लिंग व पंचा वितरण करण्यात आले.

या दोन्ही कार्यक्रमांचे प्रमुख संयोजक रेवणसिद्ध बाबुराव मेंडगुदले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीपणे पार पडले. सामाजिक, धार्मिक आणि क्रीडा परंपरेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाल्याने मंद्रूप परिसरात समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.



Post a Comment

0 Comments