सदर शिबिर डॉ. लाल पॅथलॅब्स आणि आकांक्षा फार्मा यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले. शिबिरामध्ये कोलेस्टेरॉल, फास्टिंग शुगर, हिमोग्लोबिन (Hb), कॅल्शियम, शुगर पीपी, युरिक ॲसिड, TFT, HbA1c तसेच लिपिड प्रोफाइल यांसारख्या महत्त्वपूर्ण आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.
यावेळी रोटरी क्लब ऑफ सोलापूर युजचे अध्यक्ष रो. विजय कुंदन जाधव, सचिव रो. किरणकुमार मुसळे, आय.पी.पी. रो.कपिल बायस, भावी सचिव रो. हिंदुराव गोरे, रो. आशिष सागर, रो. सत्यप्रकाश शर्मा, डॉ. लाल पॅथलॅब्सचे महादेव पाटील, नागेश क्षीरसागर, गीता कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच या शिबिरासाठी रोटरी क्लब ऑफ सोलापूर युजच्या असिस्टंट गव्हर्नर रो.डॉ. ज्योती चिडगुपकर, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.सुधीर लातुरे तसेच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट रो.जयेशभाई पटेल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
आरोग्य जनजागृती आणि प्रतिबंधात्मक तपासणीच्या माध्यमातून समाजहित जपण्याचा रोटरी क्लब ऑफ सोलापूर युजचा हा उपक्रम नागरिकांसाठी लाभदायी ठरला.



0 Comments