Advertisement

Breaking News
Loading...

श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सोलापूरात रंगणार देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धा: आयोजक संजय साळुंखे...

 


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर |  श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त संजय साळुंखे यांच्यातर्फे देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन शनिवारी (दि. ३०) दुपारी ४ वाजता राजेंद्र चौकाजवळील लाल आखाडा तालमीत करण्यात आले आहे. या कार्यक्रमास पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.


संजय साळुंखे यांच्यातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय मल्ल सहभागी होणार आहेत. या स्पर्धा लाल मातीत होणार असून विजेत्या मल्लांना संयोजकांकडून तीन लाख रुपये आणि गदा ,१ लाख रुपये आणि गदा अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमास पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार राम सातपुते, महापौर विनायक कोंड्याल, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, भाजपच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते आदी उपस्थित राहणार आहेत.

सोलापूर शहरात बऱ्याच वर्षानंतर मातीतील कुस्ती स्पर्धांचे आयोजन होत आहे. सोलापूरकरांनी या कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि कुस्ती स्पर्धांचा आनंद घ्यावा, असे आवाहन संयोजक संजय साळुंखे यांनी केले आहे.




Post a Comment

0 Comments