Advertisement

Breaking News
Loading...

मंद्रूपच्या विकासासाठी सिनेअभिनेता बलराज माने मैदानात; १ जूनपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन...

 


मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी आरिफ नदाफ | मंद्रूप गावातील विविध विकासकामे रखडल्याच्या निषेधार्थ सिने अभिनेता तथा मंद्रूपचे सुपुत्र बलराज माने यांनी १ जूनपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. याबाबत त्यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून ग्रामस्थांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

मुंबईतील चित्रपट आणि मालिकांच्या शूटिंगचे काम बाजूला ठेवून गावाच्या विकासासाठी आंदोलन करीत असल्याचे बलराज माने यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. गावातील विकासकामांचा हिशोब ग्रामस्थांसमोर यावा आणि रखडलेली कामे तातडीने पूर्ण व्हावीत, अशी त्यांची मागणी आहे.



हे आंदोलन सोमवार, दि. १ जून रोजी सकाळी ११ वाजता मंद्रूप ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू होणार आहे.



Post a Comment

0 Comments