Advertisement

Breaking News
Loading...

लांबोटी–शिरापूर मार्गावर झाड कोसळून वाहतूक ठप्प; प्रशासन झोपेत, सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटलांची तत्परता जीव वाचवणारी..!

 


मोहोळ | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | लांबोटी–शिरापूर मार्गावर अचानक मोठे झाड रस्त्यावर कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी शिरापूर येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल आबाजी पाटील यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ त्या मार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना सावध केले. त्यांच्या या सतर्कतेमुळे संभाव्य मोठा अपघात टळला.

घटनेनंतर अनिल पाटील यांनी स्वतःच्या खर्चाने जेसीबी मशीन बोलावून रस्त्यावर पडलेले झाड हटवण्याची व्यवस्था केली. त्यामुळे काही वेळातच वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.

दरम्यान, या झाडाबाबत यापूर्वी अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊनही त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप अनिल पाटील यांनी केला आहे. "जर या घटनेत कोणाचा जीव गेला असता, तर त्याला जबाबदार कोण?" असा संतप्त सवाल त्यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.

या घटनेमुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.


आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...

बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:

डॉ. राजदत्त रासोलगीकर

मुख्य संपादक

मो. 9923393329

आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत...!

Post a Comment

0 Comments