Advertisement

Breaking News
Loading...

‘नात रंगरेषांशी’ चित्रकला प्रदर्शनाचे २७ जूनपासून सोलापुरात आयोजन; युवा चित्रकारांच्या कलाकृतींची मेजवानी...

 


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | गार्डन लव्हर्स ग्रुप, सोलापूर यांच्या वतीने ‘नात रंगरेषांशी’ या चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन शनिवार, दि. २७ जून २०२६ ते शुक्रवार, दि. ३ जुलै २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. हे प्रदर्शन झपूर्झा आर्ट गॅलरी, पु. ना. गाडगीळ अँड सन्स, डफरीन चौक, सोलापूर येथे दररोज सकाळी ११.३० ते रात्री ८.३० या वेळेत खुले राहणार आहे.

या प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ शनिवार, दि. २७ जून रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला असून सोलापूरचे नामवंत चित्रकार नितीन खिलारे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाला सुयश गुरुकुलचे संस्थापक प्राचार्य केशव शिंदे , मा. सौ. भाग्यश्री जाधवअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूरमा. सौ. संध्याराणी बंडगरआंतरराष्ट्रीय टेनिसपटू (मुख्य लेखापाल, सामाजिक वनीकरण विभाग, सोलापूर) तसेच श्री. जितेंद्र जोशी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

प्रदर्शनात युवा चित्रकार वेदा होमकर आणि हर्षिता पवार यांनी साकारलेल्या विविध आकर्षक चित्रकृती मांडण्यात येणार आहेत. त्यांच्या कल्पकता, सर्जनशीलता आणि कलात्मक अभिव्यक्तीचा अनुभव सोलापूरकरांना या प्रदर्शनातून घेता येणार आहे.

नवोदित युवा चित्रकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या कलाकृती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा या प्रदर्शनामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. या प्रदर्शनाला सोलापूरकरांनी आवर्जून भेट देऊन युवा कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन गार्डन लव्हर्स ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजस शहा यांनी केले आहे.

यावेळी वेदा होमकर, हर्षिता पवार, सौ. महानंदा आळगी, सौ. प्रियांका हत्ती, अमोल मोहिते, दीपक पवार, डॉ. सारिका होमकर, डॉ. राजेंद्र लोणीकर आणि शांता येळंबकर उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments