Advertisement

Breaking News
Loading...

“जागेपणी स्वप्नं पाहा, संशोधनातून ती साकार करा!” — प्रा. डॉ. व्ही. बी. पाटील...


 

नावीन्यपूर्ण संशोधनासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा : प्रा. डॉ. व्ही. बी. पाटील

मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर |

“विज्ञान अभ्यास मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संशोधनाच्या विविध संधी उपलब्ध होत आहेत. विद्यार्थ्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन नावीन्यपूर्ण संशोधन करावे. जागेपणी स्वप्नं पाहा आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा,” असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. व्ही. बी. पाटील यांनी केले.

मंद्रूप येथील संतोष भीमराव पाटील महाविद्यालयात विज्ञान अभ्यास मंडळाचे उद्घाटन प्रा. डॉ. व्ही. बी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एन. जगताप होते. यावेळी व्यासपीठावर विज्ञान अभ्यास मंडळाचे समन्वयक प्रा. डॉ. के. यू. गरड व सहसमन्वयक प्रा. डॉ. एस. ए. निंबर्गी उपस्थित होते.

प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. पाटील यांनी विद्यार्थ्यांनी विज्ञानाकडे केवळ अभ्यासाचा विषय म्हणून न पाहता संशोधनाच्या दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन केले. “ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी सांगितल्याप्रमाणे जागेपणी स्वप्नं पाहा आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. यशस्वी शास्त्रज्ञांनी केलेले कष्ट व संघर्ष समजून घ्या. नवनवीन ॲप्स व आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घ्या,” असे त्यांनी सांगितले.

विज्ञान व तंत्रज्ञानाबरोबरच मूल्याधिष्ठित शिक्षणालाही महत्त्व आहे, असे नमूद करत विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबत सामाजिक बांधिलकी आणि चांगली मूल्ये जोपासावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी प्रा. डॉ. ज्योती नादरगी यांना महर्षी वेदव्यास राष्ट्रीय गुरु गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. एम. एन. जगताप यांनी विद्यार्थ्यांनी वर्गात नियमित उपस्थित राहून अभ्यास करावा, ग्रंथालयाचा जास्तीत जास्त वापर करावा आणि महाविद्यालयातील प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. “संशोधनाच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी ‘आविष्कार’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,” असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. के. यू. गरड यांनी केले. अतिथी परिचय प्रा. डॉ. ए. बी. तांबोळी यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. प्रवीण कांबळे यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. एस. ए. निंबर्गी यांनी मानले.




Post a Comment

0 Comments