Advertisement

Breaking News
Loading...

नागपंचमी यात्रेची जय्यत तयारी; नागनाथ देवस्थानच्या उत्सवाध्यक्षपदी आण्णाप्पा सतुबर...

 


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर |

विजापूर रोड येथील रेवणसिद्धेश्वर मंदिरासमोरील नागनाथ मंदिर देवस्थानच्या यंदाच्या नागपंचमी यात्रा उत्सवाची धुरा नूतन पदाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे. उत्सवाध्यक्षपदी महालक्ष्मी प्रशालेचे मुख्याध्यापक आण्णाप्पा सतुबर, कार्याध्यक्षपदी बसवराज सोन्नद, तर सचिवपदी लक्ष्मीकांत पुजारी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

नागनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा बैठकीचे अध्यक्ष माजी आमदार शिवशरण आण्णा बिराजदार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या बैठकीत यंदाच्या नागपंचमी यात्रा उत्सवासाठी पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली.

उपाध्यक्षपदी राम जेऊरे व रवींद्र आमणे, कोषाध्यक्षपदी नागनाथ कंटीकर व अभय मरगूर, सहसचिवपदी राजाराम दसगोंडे यांची निवड झाली. पूजा समितीमध्ये वेदमूर्ती विरेश हिरेमठ, रेवण बुक्कानुरे, रेवणसिद्ध कुसगल, उमेश बुक्कानुरे यांच्यासह मान्यवरांची निवड करण्यात आली.

बैठकीस ज्येष्ठ विश्वस्त व मार्गदर्शक शिवराया बुक्कानुरे (मामा), बाबुराव संगेपांग, विजयकुमार रामपूरे, वेदमूर्ती सिद्धया स्वामी, निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी अशोक भांजे आदी मान्यवर उपस्थित होते.

यंदाच्या नागपंचमी उत्सवात धार्मिक कार्यक्रमांसोबतच विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रम व महिला आघाडीच्या अध्यक्षा राजेश्वरी भादुले यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी पारंपरिक वेशभूषा स्पर्धा घेण्याचेही यावेळी निश्चित करण्यात आले.

बैठकीच्या प्रारंभी कै. वेदमूर्ती मल्लया स्वामी व कै. गुरुसिद्धापा हाडसंगे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विश्वनाथ आमणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

यावेळी नागनाथ बंडगर, सिद्धाराम जुगती, गंगाधर पाटील यांच्यासह देवस्थानचे विश्वस्त, पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.

नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे यंदाचा नागपंचमी यात्रा उत्सव अधिक उत्साहात आणि विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.




Post a Comment

0 Comments