Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

वडापूर येथे उपसरपंच सविता वाघचौरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन

दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथे महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार गावातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आणि भविष्यातील विकासकामां संदर्भात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.ही ग्रामसभा वडापूर गावच्या उपसरपंच सविता वाघचौरे यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसभेचे सचिव ग्रामसेवक प्रवीण कुमार घाडगे,मंद्रूप पोलिस ठाण्याचे कंदलगाव बीटचे बीटआमदार श्रीकांत भुरजे,आरोग्य विभागाचे प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.या ग्रामसभेत वडापूर ग्रामपंचायतकडून विकासकामांचा आढावा तसेच आराखडा सादर करण्यात आला.या ग्रामसभेस अंत्रोळी येथील एम एस ई बी चे वायरमन राजेंद्र राजमाने,वडापूर गावचे ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पुजारी,बायडा सिद्धार्थ कांबळे,अरुण पाटील,रिपब्लिकन सेना सोलापूर जिल्ह्याचे महासचिव सिद्धार्थ कांबळे,आनंद पाटील,प्रभाकर गरड,मलकारी पुजारी,गजेंद्र गरड,संजय वाघचौरे,रोजगार हमी सेवक रवींद्र माशाळे,विलास पाटील,अहमद तांबोळी,राहुल वाघचौरे,अंगणवाडी सेविका लांडगे,सुरेखा जावीर,अनुसया हेगडे,आरोग्य सेविका शुभांगी पाटील व त्यांचे सहकारी,बिळनसिद्ध पुजारी,माजी सरपंच लक्ष्मण पुजारी,जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका चलवादी,शेषाबाई कांबळे,राजेंद्र कोळी,राजू माशाळे तसेच सतीश दोरकर ग्रामपंचायत सेवक भीमराव कोळी,आप्पा पारसे व छत्रपती ग्रुपचे सर्व तरुण कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments