Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

शिवीगाळ का केली म्हणून एकाला बेदम मारहाण.

दक्षिण सोलापूर


तालुक्यातील बोरामणी येथे फोनवरून आम्हाला शिवीगाळ का केली म्हणून चौघांनी मिळून एकाला बेदम मारहाण केली.याचवेळी एकाने चाकूच्या पाठीमागील दांड्याने डोक्यात जोरात मारले.संदीप किसन पवार (वय २९,रा.वडजी लमाण तांडा,ता.द.सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुकेश राठोड (वय वर्षे ३०),विकी राठोड (वय वर्षे २९),अभिषेक राठोड (वय वर्षे ३५),बादल राठोड (वय वर्षे २५) या चौघांविरोधात सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,बोरामणी गावच्या शिवारात एका हॉटेलसमोर चौघे जण आले.याचवेळी फिर्यादीला 'तू फोनवरून आम्हाला शिवीगाळ का केली,' असे म्हणून हाताने,लाथाबुक्क्यांनी मारहाण करून विकी राठोड याने त्याच्या खिशातील चाकूच्या पाठीमागील दांड्याने फिर्यादीच्या डोक्यात जोरात मारून जखमी केले.याचवेळी सुजित राठोड हा भांडण करत असताना सुभाष हा सोडविण्यासाठी आला.त्यालाही चौघांनी मिळून मारहाण केली.या घटनेची नोंद सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात झाली असून,पुढील तपास पोलीस हवालदार बनसोडे हे करीत असल्याची माहिती गुरुवारी पत्रकारांना देण्सात आली आहे.


दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याची प्रतिनिधी सागर कोळी यांनी...

Post a Comment

0 Comments