Advertisement

Breaking News
Loading...

गणेशोत्सवात पोलिसांचा ‘रूट मार्च’; मंद्रूप मध्ये शांतता-सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त..! उत्सव काळात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज...


मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी आरिफ नदाफ | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंद्रूप पोलीस ठाणे हद्दीतील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, सोलापूर जिल्हा डीजे डॉल्बी मुक्त करणे तसेच गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत पार पडावा, यासाठी मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला.

पोलीस उपअधीक्षक गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली API करंडे, पोलीस अंमलदार आणि होमगार्ड यांच्या सहभागाने मंद्रूप शहरातील प्रमुख मार्गांवरून हा रूट मार्च घेण्यात आला. यावेळी पोलिसांनी विविध भागांतून संचलन करत नागरिकांना कायदा व सुव्यवस्था राखण्याचा संदेश दिला.



गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, वाहतूक सुरळीत राहावी आणि उत्सव शांततेत पार पडावा, यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च हा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि समाजकंटकांना कायद्याचा धाक दाखविण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.



Post a Comment

0 Comments