Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेचे मंद्रूपच्या अप्पर तहसीलदारांना निवेदन

महाराष्ट्र राज्यातील गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करण्यात यावा.राज्या मध्ये दुष्काळ तसेच शेतीमालचे पडलेले भाव यामुळे अभुतपूर्व कृषी संकटाचा सामना शेतकरी करीत


आहे.भाकड गाईचे संगोपन परवडणारे नसुन किमान कायद्यामध्ये तात्काळ बदल करून संकरित गायींना त्या कायद्यातून वगळण्यात यावे.तसेच मंद्रूप येथे बजरंग दलाचे कार्यकर्ते,गोरक्षक कायदा हातात घेवून काम करीत आहेत.त्यांच्यापासून शेतकरी व व्यापारी यांना संरक्षण मिळण्याची मागणी अखिल भारतीय किसान सभेने मंद्रूपच्या अप्पर तहसिलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.



यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष डॉ.शिवानंद झळके,जनरल सेक्रेटरी सुलेमान शेख,बसवराज जोडमोटे,मौलाना आझाद संघटनेचे अध्यक्ष सिकंदर आवटे,अमोल पाटील,सैफन लालूभाई नदाफ,राजकुमार घाटे,संतोष जाधव,सद्दाम शेख,कामण्णा घाटे,सैफन नदाफ आदी उपस्थित होते.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....


Post a Comment

0 Comments