माळकवठा : हॅलो रिपोर्टर न्यूज : प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे : मंद्रूप पोलीस ठाणे हद्दीतील माळकवठा (ता. दक्षिण सोलापूर) येथे पिस्तुलाचा धाक दाखवून जबरी लुटीची गंभीर घटना घडली आहे. याप्रकरणी महादेव कलाप्पा बगले (वय 42, व्यवसाय शेती, रा. माळकवठा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी रात्री सुमारे 9 वाजता आरोपी उमेश बनसिद्ध वाघमारे, सुनंदा उमेश वाघमारे, जगदीश उमेश वाघमारे व भावड्या उमेश वाघमारे (सर्व रा. माळकवठा) हे फिर्यादीच्या शेतातील घरी आले. त्यांनी शिवीगाळ व दमदाटी करत उमेश वाघमारे याने पिस्तुलाचा धाक दाखवून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील 5 लाख रुपये रोख रक्कम तसेच आई व पत्नीच्या अंगावरील मंगळसूत्र आणि फिर्यादीच्या हातातील अंगठी असे एकूण सुमारे 5 तोळे सोने जबरदस्तीने काढून नेले.
या घटनेप्रकरणी मंद्रूप पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 115(2), 309(4), 126(2), 308(2), 351(2)(3), 352, 3(5) तसेच शस्त्र अधिनियम कलम 3, 25 अन्वये गुन्हा क्रमांक 104/2026 दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास पोहेकॉ. बिराजदार करत आहेत.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..!

0 Comments