Advertisement

Breaking News
Loading...

मंद्रूप पोलीस ठाण्यात आंबेडकर जयंती उत्सवासाठी संयुक्त बैठक; शांततेत मिरवणूक पार पाडण्याचा निर्धार...

 


मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : मंद्रूप पोलीस ठाणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीला पोलीस निरीक्षक शंकर पटवारी व पोलीस उपनिरीक्षक राज डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल 38 गावांमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, तसेच पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जयंती उत्सव आणि मिरवणुकीदरम्यान घ्यावयाच्या खबरदारी, कायदा व सुव्यवस्था राखणे, तसेच शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

पोलीस प्रशासनाच्या वतीने उत्सव शांततेत व कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडता पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. त्यास सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत जयंती उत्सव उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला.

बैठकीदरम्यान विविध गावांतील मंडळाच्या प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त करत पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यामुळे यंदाचा आंबेडकर जयंती उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

या बैठकीत पोलीस निरीक्षक शंकर पटवारी व पीएसआय राज डांगे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले, तर गोपनीय विभागाचे अधिकारी सागर चव्हाण यांनी सहकार्य केले.

सदर बैठकीस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सतीश शिंदे, सुनील रणखांबे, मंद्रूपचे सामाजिक कार्यकर्ते सचिन फडतरे, जितेंद्र गावडे, प्रमोद फडतरे, कंदलगावचे संजय उडान, येळेगावचे वैभव गायकवाड, शंकर भडकुंबे, वडकबाळ गावचे घडेराव सर तसेच रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र नेते सिद्धार्थ कांबळे हे उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी सर्व जयंती उत्सव मंडळांना मार्गदर्शन केले.





आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...

बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:

डॉ. राजदत्त रासोलगीकर

मुख्य संपादक

मो. 9923393329

आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..!


Post a Comment

0 Comments