सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | दिनांक : ०६ एप्रिल २०२६ : सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन तसेच सोलापूर विकास मंच यांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. या स्वागतास महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे संचालक राजीव देसाई आणि सोलापूर विकास मंचचे संस्थापक सदस्य विजय कुंदन जाधव यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली.
यावेळी सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाठी आय.टी. पार्क, होटगी रोड विमानतळावर नाईंट लँडिंगची सोय इत्यादी सोबतच क्रीडा क्षेत्राच्या उन्नतीसंदर्भात विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. सोलापूर शहर व जिल्ह्य़ातील आवश्यक पायाभूत सुविधा तसेच भविष्यातील धोरणांबाबत सकारात्मक विचारमंथन झाले.
नवीन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सोलापूरच्या विकासासाठी प्रशासन, क्रीडा संस्था आणि सामाजिक संघटनांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज अधोरेखित केली. येणाऱ्या काळात विविध विकासात्मक कामांना चालना देत सोलापूरच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर समन्वयाने भरीव काम करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. सोलापूरमध्ये विकासाच्या दृष्टीने नवे पर्व सुरू होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..!

0 Comments