Advertisement

Breaking News
Loading...

“मंद्रूपचा मान उंचावला!” — प्रशिक्षक शिवराज मुगळे यांना राज्यस्तरीय ‘डायमंड 2026’ पुरस्कार जाहीर...

 


मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे : मंद्रूप येथील तायक्वांदो प्रशिक्षक शिवराज मुगळे यांना “उत्कृष्ट प्रशिक्षक राज्यस्तरीय डायमंड २०२६” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा बहुमान English Medium Student Sports Association, Baramati यांच्या वतीने येत्या 16 एप्रिल रोजी बारामती येथे प्रदान केला जाणार आहे.

शिवराज मुगळे यांनी तायक्वांदो या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कार्य करत अनेक गुणवंत खेळाडू घडवले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये यश मिळवून मंद्रूपचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीची व क्रीडाप्रेमाची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

या पुरस्काराच्या घोषणेमुळे मंद्रूप परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी व पालकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी काळातही शिवराज मुगळे अधिकाधिक खेळाडू घडवून क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...

बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:

डॉ. राजदत्त रासोलगीकर

मुख्य संपादक

मो. 9923393329

आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..!

Post a Comment

0 Comments