माळकवठा : हॅलो रिपोर्टर न्यूज : प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे : मंदूप पोलीस ठाण्याच्या हद्दीत माळकवठा येथे जातीय द्वेषातून शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी आणि शेतीचे नुकसान केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी उमेश बनसिध्द वाघमारे (वय 54, व्यवसाय शेती, रा. माळकवठा, ता. द. सोलापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. 22 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5 ते 5.30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शेताजवळ महादेव कलप्पा बगले, बाबू कल्लप्पा बगले व कल्लप्पा रामण्णा बगले (सर्व रा. माळकवठा) यांनी “तुम्हाला या शेतातून जाण्याचा रस्ता नाही” असे म्हणत वाद घातला. यावेळी फिर्यादी महार समाजातील असल्याचे माहीत असूनही आरोपींनी जातीय शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
तसेच, दि. 4 मार्च 2026 रोजी आरोपींच्या सांगण्यावरून विकास रमेश डोकडे याने शेतातील डीपी तोडून नुकसान केल्याचा आरोप आहे. त्याच दिवशी दुपारी बाबू बगले याने गव्हाच्या उभ्या पिकातून हार्वेस्टर मशीन नेऊन पिकाचे नुकसान केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी मंदूप पोलीस ठाण्यात गुरनं 103/2026 अन्वये भा.न्या.सं. कलम 115(2), 351(2)(3), 352, 3(5) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कलम 3(1)(2), 3(1)(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..!

0 Comments