Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

अकोले- मंद्रूप येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 11 मार्च रोजी होणार वार्षिक स्नेहसंमेलन साजरे

 अकोले- मंद्रूप येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 11 मार्च रोजी होणार वार्षिक स्नेहसंमेलन साजरे



दक्षिण सोलापूर तालुक्यातील अकोले- मंद्रूप येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवार दिनांक 11 मार्च 2024 रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सोमवार वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पंचायत समिती दक्षिण सोलापूरचे गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे, प्रमुख पाहुणे म्हणून मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, सागर सिमेंटचे व्यवस्थापक महादेव कोगनुरे, अकोले- मंद्रूप ग्रामपंचासतीच्या सरपंच प्रियांका आसबे हे उपस्थित राहणार आहेत. कंदलगावचे केंद्रप्रमुख अमसिध्द बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमात असणार आहे. या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा पत्रकार सागर कोळी यांनी केले आहे.

ही बातमी संकलित केली आहे हॅलो रिपोर्टर न्यूज चॅनेलचे संपादक सागर कोळी यांनी...

Post a Comment

0 Comments