Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मोहोळ तालुक्यातील एका गावात एका अल्पवयीन मुलीवर दोघांचा जबरदस्तीचा प्रयत्न; सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु



 मोहोळ तालुक्यातील एका गावात एका अल्पवयीन मुलीवर दोघांचा जबरदस्तीचा प्रयत्न; सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु


मोहोळ तालुक्यातील एका गावामध्ये आपल्या घरात झोपलेल्या एका १५ वर्षांच्या मुलीच्या घरात घुसून कोयत्याचा धाक दाखवून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवार, दि.13 एप्रिल होजी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास घडला. यातील पीडित मुलगी आपल्या बहिणीसमवेत घरात झोपली होती. अचानक दोघेजण वैरण कापण्याचा कोयता घेऊन घरात घुसले आणि त्यातील एकाने कोयता दाखवून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मुलीच्या सर्वांगास जखम झाल्याने दि. 14 एप्रिल रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास तिला सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती सिव्हिल पोलिसांकडून मंगळवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक सागर कोळी 

97636 21820 

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल



Post a Comment

0 Comments